AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध!
शेतीतील नवा शोध!TV9 Marathi
शेतकऱ्याच्या मुलाने लावला स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध!
➡️ कोणत्याही गोष्टीची गरज निर्माण झाली की ती उपलब्धही होते. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे जिद्द अन् परीश्रमाची. काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकिकरण वाढेलेले आहे. ➡️ पण सध्या एकच चर्चा आहे ती मराठवाड्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने लावलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे याने यंत्राचा शोध लावला असून गेल्या ४ वर्षामध्ये त्याने ४०० हून अधिक मशीन बनवल्या असून १५ राज्यांमध्ये त्या पाठलेल्या आहेत. स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून अशी होते फवारणी ➡️ वाहनांमधील आय़सी इंजिनमध्ये पिस्टन रेसिप्रोकेट होते. वाहनाला चेन असल्यामुलळे दोन्ही चाके ही फिरतात. यामध्ये उलटी प्रक्रिया आहे. चाक असणाऱ्या एका लोखंडी स्टॅंडवर खताची पिशवी लटकवता येते. यंत्र सुरु झाले की यंत्रावरील दांडा खाली-वर करण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि नोझलमधून खत फवारणी केली जाते. या फवारणी यंत्राला निओ स्प्रे पंप असे नावही त्यांनी दिले आहे. यामधून 5 जणांना रोजगार मिळाला असल्याचे योगेश गावंडे यांनी सांगितले आहे. ➡️ शहरी आणि ग्रामीण भाग याचा कोणताही फरक विद्यार्थ्यांच्या कल्पकतेवर पडत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडेही कल्पकता मोठ्या प्रमाणात असते मात्र, त्यांच्या स्वभावामुळेच त्याला पाहिजे तसा वाव मिळत नाही. तरुणांनी कोणत्याही गोष्टीचा कमीपणा न बाळगता आपले ज्ञान इतरांसमोर मांडणे गरजेचे आहे. तरच त्याचे चीज होणार आहे. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1