ऑटोमोबाईललोकमत
शेतकऱ्यांसाठी Toyota ची शानदार ऑफर!
➡️ जपानी कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक खास निर्णय घेत अनोखा ट्रेंड आणला आहे. ही कंपनी दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांना लक्झरी कार खरेदी करण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना कार खरेदी करण्यासाठी त्यांचे धान्य विकून पैसे द्यावे लागणार नाहीत, तर ते आपले धान्य थेट शोरूममध्ये आणू शकतील आणि त्या बदल्यात आलिशान कार घरी घेऊन जाऊ शकतील.
➡️ टोयोटा बार्टर नावाच्या या योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन किंवा मका या धान्याच्या बदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअप घेऊ शकतील. कंपनीनने याला अॅग्री बिझनेसचे नाव देत शेतकऱ्यांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. सोयाबीन आणि मका या धान्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक, टोयोटा फॉर्च्युनर किंवा टोयोटा कोरोला क्रॉस एसयूव्ही ही वाहने मिळून शकतील.
धान्याच्या बदल्यात मिळणार कार
➡️ या ऑफरसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि मका हे धान्य बाजार भावाने घेतले जाईल. या धान्याचे वजन बाजारभावाप्रमाणे कारच्या दरापर्यंत होईल, त्यावेळी ती कार शेतकऱ्याची असेल. तसेच, या धान्याची आधी चांगली तपासणी केली जाईल. गुणवत्ता तपासणीनंतरच ते घेतले जाईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी ब्राझीलमध्ये टोयोटाची 16 टक्के थेट विक्री कृषी क्षेत्रातून येते. अशा परिस्थितीत कार निर्मात्यांना आशा आहे की, ही ऑफर त्यांची विक्री वाढवणार आहे.
रोख किंवा कार्ड पेमेंटची झंझट नाही
➡️ 2019 साली हा पायलट प्रोजेक्ट कंपनीने सुरू केला आहे. परंतु आता हा अॅग्री बिझनेस वाढवला जात आहे, जेणेकरून कंपनीला विक्रीमध्ये लाभ मिळू शकेल. ही योजना ब्राझील देशात चालू झाली आहे. आता ते इतर ठिकाणीही राबविली जात आहे. तसेच, सध्या कंपनी ही योजना भारतीय बाजारात आणणार नाही, परंतु काही वाहने नक्कीच आणणार असल्याचे समजते.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- लोकमत
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.