AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; येथे पैसे गुंतवून मिळावा दुप्पट फायदा!
कृषी वार्ताडेलीहंट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; येथे पैसे गुंतवून मिळावा दुप्पट फायदा!
➡️ ही योजना विशेष शेतकऱ्यांसाठी तयार केली गेली आहे जेणेकरून ते त्यांच्या पैशाची दीर्घकाळ बचत करू शकतील. जर आपणही पैशांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील तसेच मॅच्युरिटीनंतर दुप्पट परतावा देखील मिळेल. ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना आहे.चला तर मग याबद्दल सर्व काही जाणून घेउयात … ➡️ किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, जिथे निश्चित कालावधीत आपले पैसे दुप्पट केले जातात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. याच्या मॅच्युरिटीचा कालावधी सध्या 124 महिने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. कोण गुंतवणूक करू शकते? ➡️ किसान विकास पत्र मध्ये गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आहे. यामध्ये सिंगल अकाउंट व्यतिरिक्त, जॉईंट अकाउंटची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्याची देखभाल पालकांनी करावी. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF किंवा NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूकीसाठी 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ती खरेदी करता येतील. व्याज दर- ➡️ आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP चा व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे आपली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा कालावधी 124 महिन्यांचा आहे. ही योजना आयकर कायदा 80 C अंतर्गत येत नाही. त्यामुळे परत आलेल्या परताव्यावर टॅक्स आकारला जाईल. या योजनेत TDS कपात केली जात नाही. ही कागदपत्रे आवश्यक आहेत- ➡️ या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, KVP फॉर्म, पत्ता पुरावा आणि बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे. संदर्भ:- डेलीहंट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
9
इतर लेख