AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात घोषणा!
कृषी वार्तासकाळ
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसंदर्भात घोषणा!
➡️ राज्य सरकारने अवसायनात काढलेल्या राज्यातील पंधरा भूविकास बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज व कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ➡️ या निर्णयानंतर कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात फटाक्या लावून जल्लोष केला. ➡️ 550 पैकी 267 कोटी हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर 283 कोटी हे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापोटी मिळणार आहेत. ➡️ या बदल्यात पंधरा भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णय होणार असून कर्मचाऱ्यांना 12 कोटी 41 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
113
20