AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी :७/१२ उताऱ्यात बदल; ‘हा’ पहा शासन निर्णय!
कृषी वार्तालोकशाही न्यूज
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी :७/१२ उताऱ्यात बदल; ‘हा’ पहा शासन निर्णय!
शेतकरी बंधूनो, जमिनीशी संबंधित समजल्या जाणाऱ्या पुराव्यापैकी महत्त्वाचा पुरावा असलेल्या सातबारा (7/12) उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसात नव्या स्वरूपातील संगणकीकृत सातबारा उतारा नागरीकांना उपलब्ध होणार आहे. या सातबारा उताऱ्यावर शासनाचा व ई. महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. तर शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा काढता येणार आहे. परंतु बऱ्याचदा बनावट सातबारा उताऱ्याच्या सहाय्याने जमीन बळकावणे, जमिनीची खरेदीव्रिकी करणे आदी प्रकार घडतात. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. आता गाव नमुना सातबारा व 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ईमहाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क असणार आहे. गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे. लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे. शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे. खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे. मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ईकराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे. नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार. भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे. नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार. बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे. क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्‍यकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे. संदर्भ - ३ सप्टेंबर २०२० लोकशाही न्यूज,
177
21
इतर लेख