क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्तासकाळ
शेतकऱ्यांसाठी बाजार खुला, कृषी विभागाने घेतलाय मोठा निर्णय!
👉जिल्ह्यातील १४ तालुक्‍यात साधारण १४०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन कृषी विभागाच्या 'आत्मा'कडून सुरू आहे. आतापर्यंत साधारण शंभरापेक्षा अधिक ठिकाणी ही केंद्रे सुरू झाल्याची माहिती आत्मा विभागातून देण्यात आली. 👉'पिकेल ते विकेल' या संकल्पनेतून शेतमालाची थेट विक्री करता यावी, यासाठी 'संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान' राबविण्यात येत आहे. त्यातून जिल्ह्यातील १४ तालुक्‍यात साधारण १४०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन कृषी विभागाच्या 'आत्मा'कडून सुरू आहे. आतापर्यंत साधारण शंभरापेक्षा अधिक ठिकाणी ही केंद्रे सुरू झाल्याची माहिती आत्मा विभागातून देण्यात आली. 👉बाजारात शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळावा, यासाठी शेतकरी गट व शेतकरीउत्पादक कंपन्यांमार्फत 'पिकेल ते विकेल' या संकल्पनेतून शेतमालाची थेट विक्री करता यावी, यासाठी 'रयत बाजार अभियान' राबविण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्र सुरू करण्यासाठी शेतकरी कंपनी व गटांना शहरात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 👉 तालुका कृषी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. त्यासाठी कृषी विभागाने ग्रामविकास, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशीही संपर्क साधला आहे. लवकरच सर्व ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील, असे 'आत्मा'तून सांगण्यात आले. 👉तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सहा वर्षांपूर्वीही थेट शेतमाल विक्रीसाठी नगर शहरात चार ठिकाणी केंद्रे सुरू केली होती. मात्र, कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे ती १५ दिवसांतच बंद पडली. आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कृषी विभागाला काळजी घ्यावी लागेल. 👉नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी थेट शेतमाल विक्रीची केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी हे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी 'आत्मा' प्रयत्नशील आहे. संदर्भ - सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
6
संबंधित लेख