AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण सुरु.
कृषी वार्तासकाळ
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; खरिपासाठीच्या पीककर्जाचं वितरण सुरु.
➡️राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ३४ हजार ९१६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. पीककर्जाचे सुमारे ७६ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकांकडून पीककर्ज वितरीत करण्यात येते. राज्यात एक एप्रिल ते ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ४६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. सहा टक्‍के व्याजदराने हे पीककर्ज दिले असून, एक वर्षात त्याची परतफेड करावी लागणार आहे. ➡️नगर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे तीन हजार १४७ कोटींचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात दोन हजार ४६५ कोटी, नाशिक जिल्ह्यात दोन हजार ३४२ कोटी, कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ९८२ कोटी, सातारा जिल्ह्यात एक हजार ७३७ कोटी, सोलापूर जिल्ह्यात एक हजार ३५६ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात एक हजार ५७६ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात एक हजार २६० कोटी आणि लातूर जिल्ह्यात एक हजार २४१ कोटींचे पीककर्ज वितरीत करण्यात आले आहे. विभागनिहाय कर्ज वितरण : (शेतकरी संख्या आणि कंसात कर्जवाटप कोटींमध्ये) : पश्‍चिम महाराष्ट्र : 18 लाख 27 हजार ४६ (१६ हजार ७२९ कोटी) मराठवाडा : १३ लाख ४६ हजार ८२७ (८ हजार २१२ कोटी) विदर्भ : १२ लाख २० हजार ७३५ (८ हजार ९९४ कोटी) कोकण : २ लाख ९ हजार ७६ (९७९ कोटी) शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीककर्ज - ➡️नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अकोला, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीककर्ज वाटप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत १६० टक्‍के पीककर्ज वाटप झाले आहे. ➡️राज्यात खरीप हंगामासाठी ऑक्‍टोबरपर्यंत ७६ टक्‍के पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज एक वर्षात परत केल्यास त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्यात येणार आहे. काही बॅंकांनी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जरकमेवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
संदर्भ- सकाळ पेपर, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
132
2