AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना!
योजना व अनुदानAgrostar
शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना!
➡️महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपन करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे जंगली जनावरांपासून, वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टळू शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिले जाते. ➡️तार कुंपण योजना 2023 या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे. विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग व पंचायत समितीकडे सादर करायचा आहे. ➡️अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - - सातबारा उतारा - गाव नमुना ८ अ - जात प्रमाणपत्र - शेतकऱ्याचे आधार कार्ड - एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र - ग्रामपंचायतीचा दाखला - समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ➡️लाभाचे स्वरूप- - हे अनुदान चार विभागांमध्ये दिले जाते - एक ते दोन हेक्टर क्षेत्रासाठी 90 टक्के अनुदान - दोन ते तीन हेक्टर क्षेत्रासाठी 60 टक्के अनुदान - तीन ते पाच हेक्टर क्षेत्रासाठी 50 टक्के अनुदान - पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. - या योजनेअंतर्गत साधारणतः दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. तर उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. - तसेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर यासाठी लाभार्थ्यांना साधारणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत. उर्वरित 25 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना भरायचे आहे.या योजनेचा अर्ज कृषी विभाग पंचायत समितीमध्ये करावा लागतो. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
156
64
इतर लेख