AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ट्रॅक्टर खरेदीसाठी देतेय कर्ज!
समाचारन्यूज १८लोकमत
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ट्रॅक्टर खरेदीसाठी देतेय कर्ज!
➡️शेती करण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन तुम्ही कंटाळला असाल आणि नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठे कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘तत्काळ ट्रॅक्टर लोन’ कर्जाची एक विशेष योजना आणलीय. या अंतर्गत SBI ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरच्या किमतीच्या १००% पर्यंत कर्ज प्रदान करते. ➡️एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर कर्ज हे कृषी मुदत कर्ज आहे. ट्रॅक्टर अॅक्सेसरीजची किंमत बँकेने दिलेल्या कर्जामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्जामध्ये घेतलेली रक्कम शेतकरी 4 ते 5 वर्षांत लगेचच बँकेत भरू शकतात. एसबीआय कर्ज कोणाला मिळणार? ➡️तत्काळ ट्रॅक्टर कर्जासाठी तुमच्याकडे किमान २ एकर जमीन असावी. ➡️सर्व शेतकरी या योजनेंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात. ➡️एसबीआयने कर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकच सह-अर्जदार बनू शकतात. अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? ➡️कर्जासाठी अर्ज भरा, यामध्ये कोणत्याही डीलरकडून ट्रॅक्टरचे कोटेशनदेखील टाका. ➡️ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅन, पासपोर्ट, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक असावे. ➡️पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्समधील एक असावे. ➡️याशिवाय लागवडीयोग्य जमिनीचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच 6 पोस्ट डेटेड चेक द्यावे लागतील. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
9
इतर लेख