AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: हि बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!
समाचारमहाराष्ट्र देशा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: हि बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!
➡️ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या मुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. ➡️ या संदर्भात आमदार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ➡️ गेल्या काही दिवसात लातूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. तसेच लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्हा बँकेच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना लाभ हाईल, अशी अपेक्षा आहे 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- महाराष्ट्र देशा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख