AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी  😊 आनंदाची बातमी; रोपवाटिकांसाठी🌱 साडेअकरा कोटींचे अनुदान
कृषी वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांसाठी 😊 आनंदाची बातमी; रोपवाटिकांसाठी🌱 साडेअकरा कोटींचे अनुदान
शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात नव्या ५०० रोपवाटिका तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी साडेअकरा कोटी रुपये अनुदान वाटले जाईल. शेतीपूरक व्यवसायाला संधी देण्याचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच्या कृषी आढावा बैठकीत धरला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेची घोषणा महाआघाडी सरकारने केली. आता कृषी खात्याने या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. राज्यात दर्जेदार व कीडरोगमुक्त भाजीपाला रोपांचा पुरवठा करणे, स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी देणे आणि पीक रचनेत बदल घडवत आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याचा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे. एक हजार चौरस मीटरचे सव्वा तीन मीटर उंचीचे फ्लॅट टाईप सहा मीटर बाय सहा मीटर ग्रीडचे एक शेडनेट, एक हजार चौरस मीटरचे प्लॅस्टिक टनेल, एक पॉवर नॅपसॅक स्प्रेअर आणि ६२ प्लॅस्टिक क्रेटस् अशी रोपवाटिका शेतकरी उभारू शकतील. त्यासाठी अंदाजे चार लाख ६० हजार रुपये खर्च येतो. यात शासनाकडून दोन लाख ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच सव्वा दोन लाखात शेतकऱ्याला रोपवाटिका तयार करता येणार आहे. योजनेची वैशिष्ट्ये १) किमान ०.४० हेक्टर जमीन व पाण्याची सोय हवी २) महिला कृषी पदवीधरांना प्रथम प्राधान्य मिळणार ३) महिला गट व महिला शेतकऱ्यांना द्वितीय प्राधान्य राहील ४) अल्प व अत्यल्प भूधारक, भाजीपाला उत्पादक, शेतकरी गटाला तृतीय प्राधान्य ५) यापूर्वी रोपवाटिका, शेडनेट, हरितगृहाचे अनुदान घेतलेले लाभार्थी या नव्या योजनेसाठी अपात्र असतील ६) अर्जाला पूर्वसंमती मिळताच साडेतीन महिन्यात काम पूर्ण करावे लागणार. प्रतिक्रिया प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे. रोपवाटिका योजनेसाठी शेतकऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत महाडीबीटी संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे देखील अर्ज करता येतील. सव्वा दोन लाखापर्यंत अनुदान वाटले जाणार असल्याने ही योजना शेतकरीप्रिय ठरेल. संदर्भ - ९ ऑक्टोबर २०२० अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
15