AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता!
कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : लवकरच जमा होणार किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता!
➡️ वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देऊन केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचा सन्मान करीत आहे.आता जमा होणारा हप्ता हा १० वा असून त्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची आनंदवार्ता मिळू शकते. ➡️ सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत १० वा हप्ता जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे.आतापर्यंत या योजनेतून केंद्राने देशातील ११.३७ कोटी शेतकऱ्यांना १.५८ लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १० वा हप्ता १५ डिसेंबर २०२१ पर्यंत जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. नोंदणी करा अन् शेवटच्या राहिलेल्या हप्त्याचीही रक्कम मिळवा ➡️ पंतप्रधान किसान योजनेचा शेवटचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्यांनी पुढील हप्त्यासह आगोदरची रक्कमही मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ४ हजार रुपये जमा होणार आहेत. याकरिता नोंदणीची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर आहे. ➡️ याकरिता केवळ पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आणखी एक २००० चा आणि डिसेंबरमध्ये २००० चा हप्ता मिळणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले ➡️ पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळतात. सरकार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन हस्तांतरित करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
12
इतर लेख