AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 शेतकऱ्यांनो, गोबरगॅस बनवण्यासाठी मिळत आहे अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
शेतकऱ्यांनो, गोबरगॅस बनवण्यासाठी मिळत आहे अनुदान!
➡️केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. केंद्र सरकारची राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम योजना ही देखील अशीक एक योजना आहे.केंद्र सरकारतर्फे मागील अनेक दशकांपासून राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. ➡️या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या गोबरगॅस तयार करून त्याचा वापर आपल्या स्वयंपाकघरात करू शकता. जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला खऱ्या अर्थाने गती मिळेल महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. ➡️केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप केले जाते. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक अशी ही एक महत्वाची योजना आहे. ➡️लाभ घेण्यासाठी येथे संपर्क साधा : जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी / कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे किंवा आपल्याच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे संपर्क साधा. ➡️केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबविली ही योजना राबविली जाते. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 9,000 रुपये, अनुसूचित जाती व जमाती यामधील लाभार्थी यांच्यासाठी 11,000 रुपये अनुदान दिले जाते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4
इतर लेख