AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनो,सरकार कडून मिळणार सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट !
कृषी वार्ताअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्यांनो,सरकार कडून मिळणार सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट !
➡️ शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत लहान-मोठ्या शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून दिले जात आहेत. वीज नसल्यामुळे सिंचनाअभावी पिकांच होणार नुकसान टाळण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा उत्पन्न वाढवता येण्यासाठी सौरपंप अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. ➡️यामुळे याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौरपंप बसवण्यात येत आहेत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप लावण्यासाठी 60 टक्के अनुदान दिले जाते. खर्चापैकी 30 ते 40 टक्के रक्कम त्यांना स्वतः भरावी लागते. ➡️शेतात सौर पंप बसवण्यासाठी प्रथम mnre.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यामध्ये सौर पंपासाठी नोंदणी करण्याचा पर्याय उजव्या बाजूला दिला आहे. याठिकाणी स्वतःची नोंदणी करा. यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. ➡️नोंदणी स्वीकारल्यानंतर अर्जामध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाइल क्रमांकावर टोकन क्रमांक तयार केला जाईल आणि पंपासाठी 60 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त 30 टक्के रक्कम जमा करावी लागेल. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
7
इतर लेख