कृषि वार्ताAgrostar
शेतकऱ्यांनी आयटीआर का भरावा? व त्याचा फायदा काय ?
➡️आयटीआर वेळेत भरल्यास त्याचे फायदे भरपूर होतात मात्र यासाठी उशीर झाल्यास मोठ्या रकमेचा दंड भरावा लागतो परंतु शेतकऱ्यांना आयटीआर का भरावा लागतो ? हा अनेकांना पडतेला प्रश्न आहे ?
➡️शेतक-यांना आयटीआर भरावा लागतो का?
शेतीचे उत्पन्न एखाद्या व्यक्तीला आहे आणि त्याला दुसरे कुठलेही उत्पन्न नाही तर त्याला आयकर भरावा लागत नाही.परंतु शेती उत्पन्नासोबत त्यात इतरही उत्पन्न शेती उत्पन्न आणि इतर उत्पन्न हे दोन्ही एकत्र करून त्यावर आयकर भरावा लागतो म्हणजेच शेती उत्पन्नासोबत इतर करपात्र उत्पन्न असेल तर शेती उत्पन्नावरसुद्धा आयकर भरावा लागतो.
➡️आयटीआर भरण्याचे फायदे :
1) जर तुम्ही नियमितपणे आरटीआर फाईल करत असाल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून सहजपणे कर्ज मिळू शकते
2) कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी करार करताना आयटीआर फाईल दाखवणे आवश्यक असते.
3) आयटीआर दाखल केलेले सर्टिफिकेट हा एक उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा म्हणून तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यासाठी महत्वाचा ठरतो
4) आयटी आर पावती तुम्ही नोंदणी केलेल्या पत्त्यावर पाठवले जाते त्यामुळे आपटीआर फाईल केल्याची पावती तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून देखील ग्राह्य धरली जाते.
5) विमा संरक्षण घेताना विमा कंपन्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आयटीआर मागू शकतात.
➡️आयटीआर भरण्याची प्रक्रिया : आयटीआर भरण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै आहे याआधी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला आयटीआर फाईल करावा लागेल ऑनलाइन पद्धतीने आयटीआर फाईत करण्यासाठी इन्कमटेक्स डिपार्टमेंटच्या www.incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करणे आवश्यक आहे
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.