AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या!
कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या!
➡️ पंतप्रधानांच्या किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये पाठविले आहेत. आता दहावा हप्ता खात्यामध्ये जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचे पैसे 10 ते 15 डिसेंबर दरम्यान जाहीर होतील. असे असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज करूनही पैसे जमा होत नाहीत, ➡️ या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज करूनही पैसे जमा होत नाहीत. लाभ घेण्यासाठी हे लक्षात असू द्या या योजनेअंतर्गत स्वत: ऑनलाइन अर्ज करताना फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरा. कारण सरकारी यंत्रणेत आता उलट-तपासणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या अर्जाची तपासणी होते. बँक खाते क्रमांक(बँक खाते) तसेच आयएफएससी कोड योग्य प्रकारे भरा. सध्याच्या स्थितीत असलेला खाते क्रमांक भरा. जमिनीचा तपशील विशेषत: खात्याचा क्रमांक खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे या बाबींमुळे पैसे जमा झाले नसतील ते तपासून पहा – अवैध खात्यामुळे तात्पुरते थांबवलेले असतील. पण खात्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यावर पैसे जमा होणार आहेत. – तुम्ही दिलेला खाते क्रमांक बँकेतच नव्हता. याचा अर्थ चुकीचा खाते क्रमांक भरला आहे. – वित्त व्यवस्थापन यंत्रणेनेाध्ये तुमचा सहभागच झालेला नसेल तरीपण पैसे जमा होत नाहीत. – बँकेने जर तुमचे खाते अमान्य केले तरी पैसे जमा होणार नाहीत. – पीएफएमएस/ पीएफएमएस बँकेने शेतकरी नोंदी नाकारल्या आहेत. – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आधार (आधार कार्ड) जमा केले गेले नाही. – राज्य सरकारच्या वतीने दुरुस्ती प्रलंबित असेल तरी पैसे हे जमा होत नाहीत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
6
इतर लेख