AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांना ₹7280 कोटींचा खरीप पीक विमा मंजूर!
👉🏻31 जुलै 2024 रोजी राज्याचे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून पिक विमा विविध योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि हाच आढावा घेत असताना त्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी माहिती देण्यात आलेली आहे. 👉🏻जुलै 2024 पिकविमा भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच कालावधीमध्ये राज्यातील जवळजवळ एक कोटी 65 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला पिक विमा भरण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्य हे पिक विमा योजनेमध्ये अर्ज करण्यामध्ये या पॉलिसी जनरेट करण्यामध्ये अव्वल असणार आहे. 24 तासांमध्ये राज्यातील जवळजवळ पाच लाख 74 हजार शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरला असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. 👉🏻खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत काढणी पश्चात अग्रीम याचप्रमाणे पीक कापणीच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे दिला जाणारा पिक विमा अशा विविध नैसर्गिक आपत्तीच्या आधारे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7280 कोटी पिक विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. 👉🏻संदर्भ : prabhudeva gr & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
0