AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकेल!
कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकेल!
➡️शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार अनेक योजना चालवत आहे, त्यापैकी एक पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेंतर्गत माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास सरकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात. याचा फायदा घेता येणार ➡️जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्वरित नोंदणी करावी लागेल. अन्यथा ही संधी तुमच्या हातातून गमावली जाईल. या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ➡️ही प्रक्रिया तुम्ही घरी बसून ऑनलाईन पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक सामान्य सेवा केंद्राद्वारे अर्ज करू शकता. तसेच आपण या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता. ➡️तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत 👇https://www.pmkisan.gov.in/registrationform.aspx या वेबसाईटवर ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. कागदपत्र - १)आधार कार्ड २)बँक खाते पास बुक ➡️मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम दुप्पट करण्यासाठी चर्चा केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
110
28
इतर लेख