AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना २ लाखांच्यावर कर्जमाफी नाही!
कृषि वार्ताप्रभात
शेतकऱ्यांना २ लाखांच्यावर कर्जमाफी नाही!
मुंबई – राज्याच्या नव्या शासनाने महात्मा फुले यांच्या नावाने जी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्या कर्ज माफीचा लाभ दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लागू असणार नाही, अशी बाब समोर आली आहे. या कर्जमाफी योजनेविषयी जो जीआर जारी करण्यात आला आहे, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत २ लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत त्याची कर्जफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले जाणार आहे. तथापि, ज्या शेतकऱ्यांनी २ लाख रूपयांपेक्षा अधिक पीककर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज मात्र माफ केले जाणार नाही. राष्ट्रीयकृत बॅंकांमधील, खासगी किंवा ग्रामीण बॅंकांमधील शेतकऱ्यांची एनपीए ठरलेली कर्ज माफ करायची किंवा नाही यावर सहकार व अर्थ विभागाची एक समिती निर्णय घेणार आहे. संदर्भ – प्रभात, २९ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0