AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये
योजना व अनुदानAgrostar
शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये
➡️पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत, देशातील सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाते. . प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा ३००० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाते. ➡️या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे वय 18 ते 40 वर्षे असावे. मानधन योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाईल. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये दिले जातील. ➡️पीएम किसान मानधन योजना 2023 अंतर्गत, लाभार्थीचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. या योजनेंतर्गत वृद्धापकाळात दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ➡️या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड,ओळखपत्र,वय प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,बँक खाते पासबुक,मोबाईल नंबर,पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ➡️या योजनेसाठी इच्छुक शेतकरी https://maandhan.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
33
8
इतर लेख