AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील 36 हजार; महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये!
कृषी वार्तालोकमत
शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील 36 हजार; महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये!
➡️ देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या वतीने अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा फायदा होत आहे. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जात आहेत. ➡️ किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच सरकारची आणखी एक योजना देखील आहे. ज्याअंतर्गत शेतकरी दरवर्षी तब्बल ३६००० हजार रुपये मिळवू शकतात. प्रधानमंत्री किसान मानधन योजना असं या योजनेचं नाव आहे. ➡️ शेतकरी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी पेन्शन म्हणून ३६००० रुपये मिळवू शकतात. या योजनेचा कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल, त्याचा सहजपणे कसा लाभ घ्यावा हे जाणून घेऊया... ➡️ प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या ६० व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ कोणाला मिळणार? ➡️ १८ ते ४० वर्षे वयोगटातील आणि अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्यांची २ हेक्टर किंवा त्याहून कमी शेतजमीन आहे. किसान पेन्शन योजना २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे ➡️ आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेताचा सातबाराचा उतारा, बँक खात्याचे पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ कसा मिळेल, काय आहे नोंदणीची पद्धत? ➡️ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी CSC) वर जाऊन नोंदणी करता येईल. आपण स्वतःही यासाठी नोंदणी देखील करू शकतो. सर्व कागदपत्रे नोंदणीच्या वेळी जवळ ठेवावी लागतील. किती नफा मिळेल? ➡️ किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) १८ वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा ५५ रुपये किंवा वर्षाकाठी ६६० रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळेल. सरकारने सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम दरमहा आणि वार्षिक जमा करावी. म्हणजेच, जर आपण २५ वर्षांचे असाल तर आपल्याला या योजनेंतर्गत किती पैसे जमा करावे लागतील, याबद्दल योजनेत माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे आपण या योजनेत जेवढे पैसे जमा कराल, तितकेच सरकारही जमा करेल. योजना मध्येच सोडून दिल्यास किंवा लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास पैशांचे काय होईल? जर लाभार्थ्याने योजना मध्येच सोडली किंवा पैसे जमा करणे थांबवले तर, तोपर्यंत जमा केलेले पैसे सुरक्षित असतील. जमा केलेल्या रकमेवर, बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याज म्हणून मिळेल. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
50
22
इतर लेख