AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना तब्बल ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान!
योजना व अनुदानAgroStar
शेतकऱ्यांना तब्बल ३३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान!
👉🏻नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांच्या परभणी जिल्ह्यात अखेर ८ हजार २४५ महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या महिला शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे ३३ कोटी ३३ लाख १६ हजार रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहे. 👉🏻पोकराअंतर्गत जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी महिला शेतकरी लाभार्थीची संख्या २०.२७ टक्के आहे. पोकरा अंतर्गत एकूण ३ टप्प्यात परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायती अंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६६ हजार २६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६३ हजार ७१२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली. 👉🏻या शेतकऱ्यांनी बीजोत्पादन, तुती लागवड, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन, शेततळे, शेडनेटगृह, हरितगृह, मत्स्यपालन, विहीर खोदकाम, विहीर पुनर्भरण, कृषी पंप, पाइप, फळबाग लागवड, रेशीम शेती, शेळीपालन, व्हर्मिकंपोस्ट आदी वैयक्तिक घटकांच्या लाभासाठी १ लाख ९१ हजार ८७३ अर्ज केलेले आहेत. 👉🏻अनुदानासाठी आवश्यक त्या पडताळणीनंतर लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे जिल्ह्यातील महिला व पुरुष मिळून एकूण ४० हजार ६७० शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १३८ कोटी ८३ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले. त्यात महिला शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ८ हजार २४५ (२०.२७ टक्के) असून अनुदानाची रक्कम ३३ कोटी ३३ लाख १६ हजार रुपये (२४ टक्के) आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख