योजना व अनुदानAgrostar
शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी मिळणार 12 लाख रुपये अनुदान !
➡️सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. आपण पाहिले तर केंद्र पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील मोठे अनुदान दिले जाते.
➡️शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी संघ यांना २५० टन शेतीमाल साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.
➡️इतके मिळणार अनुदान :
विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत २०२२-२३ या योजनेअंतर्गत २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून, इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी संघ यांना अर्ज सादर करता येतील. यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाइन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे.
➡️गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारून करावा. याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराइज्ड हमीपत्र आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधार कार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे ता. ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी सादर करावेत.
➡️अनुदानाचा लाभ कधी मिळणार :
पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, उत्पादक संघ कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्याने दिले आहे.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.