AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळेल 3000 रुपये पेन्शन!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळेल 3000 रुपये पेन्शन!
➡️जर तुम्ही पीएम-शेतकरी सन्मान निधी योजनेचे खातेधारक असाल तर तुमची नोंदणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पंतप्रधान शेतकरी मानधन या योजनेसाठी होईल. तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या तीन हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या ६००० रुपयांसह वार्षिक ३६००० रुपयांच्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. ➡️या योजनेचं नाव पंतप्रधान किसान मानधन योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वृद्धापकाळात योग्य जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाते. या अंतर्गत देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होताच त्यांना ३००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर पीएम किसान मानधन योजनेनुसार दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळतील. ➡️पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याच्या वयानुसार, दर महिन्याचं योगदान कमीत कमी ५५ ते जास्तीत जास्त २०० रुपये आहे. अर्थात कमीत कमी ६६० रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त २४०० रुपये वार्षिक भरावे लागतील.या अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल. जर लाभार्थी शेतककऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला १५०० रुपये दिले जातील. ➡️या स्कीमसाठी लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्या खात्यात पेन्शनचे पैसे डिरेक्ट ट्रान्सफर केले जातीलय. कशाप्रकारे कराल अर्ज? किसान मानधन योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या साइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याठिकाणी तुम्हाला नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, कॅप्चा कोड इ. माहिती द्यावी लागेल. यानंतर ओटीपी जनरेट होईल, तो प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर एक अॅप्लिकेशन फॉर्म भरून तो सबमिट करावा लागेल. या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला तो वापरता येईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
69
15
इतर लेख