AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ६७५ कोटी मंजूर!
कृषि वार्ताAgrostar
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ६७५ कोटी मंजूर!
👉🏻महाराष्ट्र राज्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. 👉🏻शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली. 👉🏻राज्य सरकारने माघील आठवड्यात मदत देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. 👉🏻याआधी शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. 👉🏻यामुळे या शेतकऱ्यांना आता लवकरच रक्कम मिळणार आहे. यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
8
इतर लेख