AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनाही आता पेन्शन, अर्ज करा आजच!
कृषी वार्ताtv9marathi
शेतकऱ्यांनाही आता पेन्शन, अर्ज करा आजच!
➡️शेतकऱ्यांना केवळ शेतीमालाचाच आधार असतो. या व्यतिरिक्त कमावण्याचे दुसरे कोणते साधन नाही की, कोणती पेन्शन. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार कायम शेतकरी हीताच्या योजना राबवण्यावर भर देत आहे. ➡️ शेती उत्पादन वाढीबरोबरच इतर माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास व्हावा या दृष्टीने पीएम किसान मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नौकरदाराप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. ➡️या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये. सध्या शेती व्यवसयात बदल होत आहे. शिवाय उत्पादनात देखील वाढ होत आहे. अटी-नियम ➡️पीएम किसान मानधन योजनेमध्ये कोणत्याही शेतकऱ्यास सहभाग घेता येणार आहे. यामध्ये सहभाग नोंदवल्यानंतर त्याच्या ६० वर्षापासून पुढे महिना 3 हजार म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र, याकरिता शेतकऱ्यांना प्रीमीयम अदा करावा लागणार आहे. ➡️पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्याचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे दरम्यान असावे. या योजनेत त्यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतरच शेतकऱ्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ➡️पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे. यानंतर तेथे सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल. यानंतर तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल. नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
4
इतर लेख