AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे!
समाचारTV9 Marathi
शेतकऱ्यांनाच विकत घेता येणार आता कृषी विद्यापीठाचे बियाणे!
➡️ रब्बी हा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे.रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे हे विकत घेता येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे बियाणे विकत घ्यावयाचे झाले तर शेतकऱ्यांना थेट परभणी येथील विद्यापीठात जावे लागत होते. आता मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथील विद्यापीठाच्या केंद्रावरच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. ➡️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत यावर्षीपासून औरंगाबाद येथील केंद्रावरही बियाणे उपब्ध असणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे अवाहन प्रा. रामेश्वर ठोंबरे यांनी केले आहे. आता शेतकऱ्यांना बियाणासाठी परभणीला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. ➡️ आता बियाणे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे प्रा. ठोंबरे यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथील विभागीय कृषी विस्तार केंद्र पैठण रोड येथे हे बियाणे उपलब्ध राहणार आहे. ➡️ रब्बी हंगामात यंदा शेतकऱ्यांचा भर हा हरभरा पिकावर राहणार आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला प्राधान्य हे दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत करडई, हरभरा, ज्वारी, जवस या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता रामेश्वर ठोंबरे यांच्या 9420406901 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे. बियाणांचे असे असणार आहेत दर ➡️ ज्वारी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणाच्या चार बॅग ह्या एका शेतकऱ्यास मिळणार असून याची किमंत ही प्रतिबॅग 320 रुपये राहणार आहे. बीडीएनजीके 797 या वाणाचा हरभऱ्याची 10 किलोची बॅग 800 रुपयांना राहणार आहे. तर काबुली बीडीएनजीके 798 ही 10 किलोची बॅग ही 1000 रुपयांना राहणार आहे. करडई पी.बी.एन.एस 12 (परभणी कुसुम ) पी.बी.एन.एस 86 (पूर्णा) ही 5 किलोची बॅग 500 रुपयांना राहणार आहे. तर लातूर 93 वाणाचे जवस याची 5 किलोची बॅग ही 500 रुपयांना राहणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
6
इतर लेख