कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा!
➡️कृषी क्षेत्रात डिजिटल प्रणाली वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या समोर डिजिटल प्रणाली आणली जात आहे. याचाच एक नमुना म्हणून आता डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम राज्यसरकारच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. ➡️त्यामुळे आता गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी हा डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. गावस्तरावर ग्रामसभांमध्ये याचे वाटप केले जाणार आहे. ➡️राज्य आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्नशील असून वेगवेगळे उपक्रम जेणेकरून डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांना समजेल हा उद्देश सराकरचा राहिलेला आहे. ग्रामसभांमधून शेतकऱ्यांच्या खाते उताऱ्याचे वाचन होणार आहे. वर्षभर मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ही ग्रामसभेला द्यावी लागणार आहे. डिजिटल सातबारे देण्यास सरकारने यापुर्वीच परवानगी दिलेली आहे. २ ऑक्टोंबर पासून या मोहिमेला राज्यात सुरवात करण्यात आलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया ➡️KCC मिळवणे सोपे आहे, यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल. KCC साठी आवश्यक कागदपत्रे ओळखपत्रासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे अॅड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
9
इतर लेख