कृषी वार्तालोकमत
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील 4,000 रुपये! फक्त करावे लागेल 'हे' काम!
➡️ पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत २००० रुपयांऐवजी ४००० रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. दरम्यान, जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत नाहीत, ते आता नोंदणी करू शकतात. ➡️ नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात खात्यात २००० रुपये येतील. यानंतर, डिसेंबर महिन्यात तुमच्या बँक खात्यात २००० रुपयांचा हप्ता येईल. म्हणजेच, जर तुम्हाला ४००० रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला ३० सप्टेंबरपर्यंत मोठी संधी आहे. ➡️ पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. आपले बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपयांच्या हप्त्यावरून अनेक बदल करण्यात आले आहेत. ➡️ तुम्ही आपली कागदपत्रे pmkisan.gov.in या वेबसाइटवर अपलोड करू शकता. या वेबसाइटवर तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि तुम्हाला आधार कार्ड जोडायचा असेल तर त्यासाठी तुम्ही Edit Aadhaar Detailच्या ऑप्शनवर क्लिक करुन अपडेट करू शकता. असे तपासा तुमचे नाव : १) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल. ३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. ४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल. ५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
172
45
इतर लेख