कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथून ‘पंतप्रधान किसान योजने’स रविवारी सुरूवात केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट २ हजार रुपये जमा झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढविणार असल्याची भावना गोरखपूर येथे राष्ट्रीय किसान संमेलनाच्यावेळी व्यक्त केली. या संमेलनात एका क्लिकवर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार असे एकूण २१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ‘राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजने’चा पहिला हफ्ता रविवारी देण्यात आला असून, पुढील रक्कम दोन हफ्त्यात मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ हप्त्यात ६ हजार रूपये मिळणार आहेत. या पैशातून बि-बियाणे, खते, कृषी अवजारे इत्यादी शेतीशी निगडीत बाबींचा प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे देशातील जवळपास १२ कोटी छोट्या शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५ हजार कोटी थेट जमा होणार आहेत.” संदर्भ – कृषी जागरण, २५ फेब्रुवारी २०१९
351
0
संबंधित लेख