कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार!
➡️पीएम किसान योजनेच्या 9 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पैसा लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात येणार आहे. 1 ऑगस्टनंतर 11 कोटीहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. जर कोणी आयकर भरत असेल आणि त्याच्या खात्यात पैसे आले, तर त्याला ते परत करावे लागतील.
➡️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छित असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आता आपण हे सहजपणे जाणू शकता.
आपले नाव असे तपासा
👉 पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
👉 त्याच्या होमपेजवरील Farmers Cornerच्या पर्यायावर क्लिक करा.
👉या कोपऱ्यात आपल्याला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
👉यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करून राज्य, जिल्हा, तहसील, गट आणि गाव निवडा.
👉मग गेट रिपोर्टवर क्लिक करा. गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आपल्या समोर उघडेल.
👉यामध्ये आपण हे पाहू शकता की गावातील कोणत्या व्यक्तीला पैसे मिळत आहेत आणि कोणाला नाही.
👉अर्जानंतर पैसे का मिळत नाहीत, त्याचा उल्लेखही या पानावर केला जाणार
याप्रमाणे स्टेटस जाणून घ्या, नोंदणी करा
👉 फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) या वेबसाईटच्या लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.
👉 उघडलेल्या पृष्ठामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून आपण स्थिती जाणून घेऊ शकता.
👉 आपण घरी बसून या योजनेसाठी नोंदणी करू शकता, यासाठी आपल्याकडे आपल्या महसुली नोंदी असणे आवश्यक आहे. उदा. सातबारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- TV9 Marathi.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.