AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये!
कृषि वार्ताAgroStar
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये!
👉🏻राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येऊ शकतो. परंतु जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर काही अटी पूर्ण करावा लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे. 👉🏻पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. पीएमकिसान योजनेप्रमाणेच महाभैतीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर ‘नमो शेतकरी महासम्मान निधी’ योजनेचे मॉड्यूल विकसित करण्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरात लवकर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील. 👉🏻आता राज्य सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहे.यानुसार, केंद्राकडून 6,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. 👉🏻लाभार्थी यादीमध्ये नाव तपासा: तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल किंवा तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे. त्यासाठी दिलेल्या लिंक https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary वर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव तपासू शकता. 👉🏻नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार शेडिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेची जोडून घ्या. तुमचे नाव चुकले आहे का तपासा. बँकेवर काही कुठे चूक झाली आहे का ते चेक करा. तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. 👉🏻संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
0
इतर लेख