AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संधर्भात मोठा निर्णय!
👉🏻महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे पोर्टल पुन्हा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. मागील जवळपास एक वर्षापासून हे पोर्टल बंद होते. पोर्टल बंद असल्याने पात्र असताना सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. तसेच जे लाभार्थी 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र होते हे लाभार्थी सुद्धा अनुदानापासून वंचित होते. 👉🏻परंतु पोर्टल आता नव्याने सुरू करण्यात आले असून विविध जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा तसेच प्रोत्साहन पर 50000 अनुदानाचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने 30/नोहेंबर पर्यंत बँकाना माहिती मागवण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. तुम्हाला जर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ तसेच 50000 प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही बॅकेत संपर्क करु शकता. 👉🏻संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
12
इतर लेख