AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ!
कृषी वार्ताTV9 Marathi
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची कृषी उडाण योजना, असा घ्या लाभ!
➡️ शेती व्यवसयात शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, शेती उत्पन्न हे दुपटीने वाढावे याकरिता केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री कृषी उडाण योजना ही देखील त्यापैकीच एक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रगती शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. कृषी उडाण ही अशी एक योजना आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. पंतप्रधान कृषी उडाण योजना आहे तरी काय? ➡️ शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, अशा परिस्थितीत त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. बाजारातच मालाचा साठा होत राहिल्याने पिके खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट हे वाया जाते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी पिके बाजारात नेण्यासाठी पंतप्रधान कृषी उडान योजना सुरू करण्यात आली. या उत्पादनासाठी होणार योजनेचा फायदा ➡️ कृषी उडाण योजना 2021 च्या मदतीने शेतकरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे उत्पादने लवकरात लवकर त्यांच्या बाजारात दाखल करु शकणार आहे. कारण हवाईच्या माध्यमातूनही याची वाहतूक करता येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. असा घ्या योजनेचा लाभ या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथमता नोंदणी करावी लागेल. लाभ मिळविण्यासाठी पात्रता आणि कागदपत्रे 1) प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झाल्यास अर्जदाराला भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल. 3) अर्जासाठी आवश्यक आधार कार्ड 4) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील 5) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे. 6) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो. 7) रेशन कार्ड. 8) मोबाइल क्रमांक 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
5
इतर लेख