AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांची चिंता वाढली , तणनाशकामध्ये 40 टक्क्यांनी वाढ !
कृषी वार्ताAgrostar
शेतकऱ्यांची चिंता वाढली , तणनाशकामध्ये 40 टक्क्यांनी वाढ !
➡️ सध्यस्थितीत 95 टक्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. सद्यस्थितीत शेतशिवारात सर्वच पिके डोलत आहे. आगामी काळात अंतर्गत मशागतीला वेग येणार असून वाढत्या मजुरीचे दर बघता शेतकर्‍यांनी निंदणाचा खर्च वाचविण्यासाठी तणनाशकांचा वापर करण्याची तयारी केली आहे. मात्र, तणनाशकाचे दर यंदा 40 टक्क्यांनी वाढले तर काही तणनाशकांचे दर दुप्पट झाल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. जे तणनाशक पूर्वी 380 प्रति लिटर रुपये होते ते यंदा 630 प्रति लिटर प्रमाणे विकल्या जात आहे. दुसर्‍या एका कंपनीचे Herbicides तणनाशक 950 रुपये आता 1150 रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे. ➡️ मजुरीतही वाढ : संततधार पावसामुळे मशागतीची कामे थांबली आहे. पाऊस थांबल्यावर आंतर मशागतीची कामे सुरू करणे क्रमप्राप्त आहे. मजुरीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. तण नियंत्रणासाठी महिला मजुरांची निंदणाची मजुरी 250 रुपये, डवरणीच्या पुरुषाला 400 ते 450 रुपये आणि फवारणीसाठी 550 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. ➡️नामांकित कंपनींचा नकार : यंदा अनेक कंपन्यांनी तणनाशकांच्या किंमती वाढविल्यात. पण, अनेक नामांकित कंपनीतर्फे 1500 रुपये प्रति लिटर दराने विक्रीसाठी औषधी देणे जमत नाही. तुलनात्मक दर ठेवल्यास गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
4
इतर लेख