AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांचा माल थेट विमानाने जाणार परदेशात !
योजना व अनुदानAgrostar
शेतकऱ्यांचा माल थेट विमानाने जाणार परदेशात !
➡️सरकार सतत वेगवेगळ्या योजना राबवत शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता प्रयत्न करतं. शेतकऱ्यांनी पिकवलेले शेतीतील पीकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर यावे यासाठी देखील वेगवेगळ्या उपाययोजना राबवतं. त्याचबरोबर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे जास्त शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन निघत आहे. मात्र, याउलट शेतकऱ्याचा पिकाला योग्य ती बाजारपेठ मिळत नाही. आता सरकारने एक हटके योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे. ज्याद्वारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतील. ➡️काय आहे सरकारची ‘ही’ योजना: आपल्या भारत देशांमधील जवळपास 60 टक्के नागरिकांचा शेतकरी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या 60 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा केवळ शेती व्यवसायावरच चालतो. याच कारणामुळे शेतकऱ्याच्या पिकांना योग्य तो भाव मिळणे गरजेचे आहे. यासाठीच सरकारने पुढाकार घेत 2021 मध्ये ‘कृषी उड्डाण योजना’ चालू केली होती.यामुळे नाशवंत शेतीमालाची लवकर वाहतूक शक्य झाल्याने योजनेचा जास्त फायदा होऊ लागला.सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी विमानांमध्ये आरक्षित जागा ठेवून त्यांना अनुदान देखील दिले जात आहे. ➡️या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता : प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झालेल्या अर्जदाराला, १.भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक २.अर्जदार शेतकरी असणे आवश्यक ३.अर्जासाठी आधार कार्ड अनिवार्य ४.शेतीशी संबंधित काअर्जदाराने ५.निवास प्रमाणपत्र ६.दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो ७.रेशन कार्ड अनिवार्य ८.माहितीसाठी मोबाइल नंबर आवश्यक ➡️संदर्भ: मी E शेतकरी हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4
इतर लेख