AgroStar
शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारच्या 'या' आहेत महत्त्वाच्या कृषी योजना
योजना व अनुदानAgrostar
शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारच्या 'या' आहेत महत्त्वाच्या कृषी योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला आज आपण जाणून घेऊया काही म्हंत्वाच्या कृषी योजना, देशातील शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. येणार्‍या काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. या योजनांचा लाभ अनेक शेतकरी घेत असून त्याचा त्यांना फायदाच होत आहे. आज तुम्हाला केंद्र सरकारतर्फे शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. ➡️१. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने शेतकर्‍यांसाठी राबविलेल्या योजनांपैकी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतातील शेतकर्‍यांना एका वर्षात ६००० दिले जातात जे २००० च्या ३ हप्त्यांमध्ये दिले जातात. ही योजना २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत एकूण ११ हप्ते जारी केले आहेत. या योजनेमुळे भारतातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. ➡️२. प्रधानमंत्री किसान मानधन योजना : या योजनेद्वारे भारत सरकारकडून शेतकर्‍यांना पेन्शनची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जे शेतकरी वृद्धापकाळात असहाय्य झाले आहेत आणि इतरांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शनची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकार ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या शेतकर्‍यांना किमान ३००० रुपये पेन्शन देते. पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकर्‍याला वयाच्या ६० वर्षापर्यंत ५५ ते २०० प्रति वर्ष जमा करावे लागतील. ६० वर्षे संपल्यानंतर शेतकर्‍यांना पेन्शन मिळू लागते. कोणत्याही कारणाने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास शेतकर्‍याच्या पत्नीला ५० टक्के पेन्शन दिली जाईल. ➡️३. पंतप्रधान कुसुम योजना : शेतकर्‍यांना वेळेवर वीज न मिळाल्याने त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, त्यामुळे पिके खराब होतात. शेतकर्‍यांच्या या समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने पंतप्रधान कुसुम योजना राबवली आहे. ज्या अंतर्गत शेतकर्‍यांना सौर पॅनेल खरेदीवर अनुदान दिले जाते. ➡️४. सेंद्रिय शेती योजना : या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. भारत सरकारकडून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी भारत सरकारने सेंद्रिय शेती योजना सुरू केली. या योजनेत सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांना शासनाकडून बक्षीस दिले जाते. ➡️५. प्रधानमंत्री फसल विमा योजना : शेतकर्‍यांना शेतीमध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. गारपीट, पूर, जोरदार वादळ या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकर्‍यांची पिके उद्ध्वस्त होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. या सर्व समस्यांमुळे सरकारकडून पंतप्रधान फसल विमा योजना राबविण्यात येत आहे. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1
इतर लेख