योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना!
➡️शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.
➡️घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केली होती.
➡️गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' हि अशीच एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाते. किंवा अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाते.तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल हनयन घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.