AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी सन्मान’च्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ !
कृषी वार्ताAgrostar
शेतकरी सन्मान’च्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ !
➡️पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत ई - केवायसी करता येईल. यापूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती.अशी माहिती सूत्रांनी दिली. ➡️पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील, अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. ➡️घरबसल्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करा : ई-केवायसी करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. त्यानंतर ई-केवायसीचा दिलेला पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि आधार लिंक केलेला फोन नंबर एंटर करा. यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल. शेवटी तुम्हाला हा OTP योग्य ठिकाणी भरावा लागेल आणि तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. ➡️जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी केले. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
11
इतर लेख