AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेणापासून अश्या पद्धतीने तयार करा कंपोस्ट !
जैविक शेतीAgrostar
शेणापासून अश्या पद्धतीने तयार करा कंपोस्ट !
➡️पिकांचे भरघोस वाढीसाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करतात. परंतु सेंद्रिय खतांच्या तुलनेमध्ये अजून देखील रासायनिक खतांचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात केला जातो. याव्यतिरिक्त कोंबडी खत, शेणखत इत्यादींचा वापर शेतकरी आता मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. परंतु पिकांच्या भरघोस वाढीसाठी अगदी कमी खर्चात शेण आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून कमीत कमी खर्चात नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. ➡️अशा पद्धतीने तयार करावे कंपोस्ट खत : 1- नाडेप टाकीची रचना- यासाठी सर्वप्रथम दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तीन फूट उंच आकाराची साधी आयताकृती विटांची पक्की टाकी बांधणे गरजेचे आहे. परंतु टाकीचे बांधकाम करताना एका गोष्टीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे ती म्हणजे टाकीचा खालचा थर हा सिमेंट व वाळूमध्ये बांधावा. टाकीचे बांधकाम करत असताना मध्ये हवा खेळती राहावी यासाठी थोडी मधून थोडी मोकळी जागा सोडावी. त्यामुळे अवशेषांची कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास मदत होते. बांधकाम करत असताना दोन विटांचा थर दिल्यानंतर जेव्हा तिसरा थर द्याल त्यामध्ये प्रत्येक दोन विटांनंतर सहा ते सात इंचाची मोकळी जागा सोडणे गरजेचे आहे.व अशाच पद्धतीने विटांचे नऊ ते दहा थर बांधून घेणे गरजेचे आहे. या नऊ ते दहा थरांमध्ये तिसऱ्या, सहाव्या आणि नव्या थराला हवेसाठी मोकळी जागा सोडावी व अशा पद्धतीने 74 छिद्रे असलेली टाकी बांधावी. टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तळाला विटांचा कठीण थर द्यावा व टाकीच्या भिंती आतून माती आणि शेणाने चांगले लिपून घ्याव्यात. 2- अशा पद्धतीने भरावी टाकी- टाकी भरण्याच्या अगोदर टाकीचा मधला भाग शेण आणि पाणी यांच्या मिश्रणाने ओला करून घ्यावा. जे काही तुमच्याकडे सेंद्रिय पदार्थ आहे त्यांचे बारीक तुकडे करून सहा इंच जाडीचा पहिला थर द्यावा व दुसऱ्या थरांमध्ये 150 लिटर पाण्यामध्ये चार किलो शेण मिसळून शिंपडावे. त्यानंतर तिसरा थरांमध्ये शेण आणि मातीचा 20 ते 60 किलो या प्रमाणात एकसारखा थर द्यावा आणि पाण्याने ओला करून घ्यावा.टाकी भरत असताना दहा ते पंधरा थर देऊन एक ते दीड फूट वर उंची येईल इतकी भरावी व नंतर माती व शेणाने झाकून घ्यावी. उत्तम खत तयार होण्यासाठी या कंपोस्ट टाकीमध्ये आद्रतेचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांपर्यंत रहावे यासाठी सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. या माध्यमातून तीन ते चार महिन्यांनी उत्तम प्रतीचे अडीच ते तीन टन कंपोस्ट तयार होते. तयार झालेले हे कंपोस्ट खत चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावे व उरलेला भाग परत नाडेप कंपोस्टसाठी त्याचा वापर करावा. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0