AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
शेजारच्या जमिनीतून पाईपलाईन नेण्याचा अधिकार!
👉🏻शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. जेव्हा आपल्याला एखादे धरण किंवा तलाव किंवा आपल्या दुसऱ्या गट नंबर मधील विहिरीतून दुसऱ्या शेतामध्ये पाण्याची पाईपलाईन आणायचे असते व त्या पाईपलाईनला काही शेतकऱ्यांकडून विरोध केला जातो. या संबंधित देखील बऱ्याचदा वाद उद्भवताना आपल्याला दिसून येतो. 👉🏻कारण आपल्याला माहित आहे की बरेच शेतकरी पाण्याच्या सोयीसाठी एखादा तलाव किंवा धरण, तसेच काही शेतकऱ्यांच्या दोन ठिकाणी शेती असतात व एखाद्या शेतीमध्ये विहिरीला चांगले पाणी राहिले तर त्या ठिकाणहून ज्या ठिकाणी दुसऱ्या शेतात पाणी नाही त्या ठिकाणी पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी आणले जाते. जेव्हा ही पाईपलाईन आणली जाते तेव्हा ती दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून आपल्याला आणावे लागते. तसेच काही वेळेस पाणी आणण्यासाठी पाण्याचा पाटचारी देखील दुसऱ्याच्या शेतामधून आपल्याला आणावी लागते. 👉🏻यामध्ये शेतकऱ्यांमधील संबंध चांगले असतील तर काही हरकत नसते परंतु बऱ्याचदा यामध्ये शेतकरी आडकाठी ठेवतात किंवा हरकत घेतात व त्या अनुषंगाने वाद निर्माण होतात. अशा प्रसंगी काही कायदेशीर तरतुदी आहेत का? हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती व्हिडिओ मध्ये पहा. 👉🏻संदर्भ : Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
0