AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शुन्यातून निर्माण केले विश्व!
सफलतेची कथाशेतकरी महिला मंच
शुन्यातून निर्माण केले विश्व!
शुन्यातून निर्माण केले विश्व! म्हणतात ना, आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असेल, तर माणूस कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असतो, असेच काहीसे औरंगाबाद जिल्हयातील पेंडगाव तालुक्यातील फुलंब्री येथील महिला शेतकरी सविता सुनिल डकले यांच्याबाबतीत घडले आहे. सविता यांना लहानपणापासून आयुष्यात काहीतरी करायचे हे मनात त्यांनी ठासून ठेवले होते. मात्र शिक्षणाची आवड असून ही कौटुबिक परिस्थितीमुळे त्यांना फक्त दहावीपर्यंत शिकता आले. पुढे काही वर्षातच त्यांच्या कुटुंबाने त्यांचे लग्न लावून दिले. आता, सर्व संपले असे वाटत असतानाच, त्यांच्या आयुष्यात काहीतरी करण्याच्या आशेला सासरच्यांनी किरण दाखविले. त्यांची स्वप्न साकार होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्यांच्या पतीने त्यांना घरी न बसता शेती करण्यासाठी बाहेर पड असा सल्ला दिला. मात्र शेतीतील शुन्यदेखील येत नाही, असे म्हणत त्यांनी शुन्यातून विश्व निर्मिती करण्याची तयारी दर्शविली. पतीने शेतीसंबंधित कामे शिकविण्यास सुरूवात केली. लग्नापूर्वी शेतीचा ‘अ’ ही येत नसताना, काहीतरी करण्याच्या आत्मशक्तीने त्यांनी अवघ्या सहा महिन्यातच पतीकडून शेतीचे पूर्ण प्रशिक्षण घेतले. सविता यांच्या कुटुंबात २ मुले, पती व सासू-सासरे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी शेतीची ही जबाबदारी खांदयावर घेतली. अवघ्या एक एकरमध्ये त्यांनी डाळिंब कापूस यासारखी पिके लावली. एवढेच नाही, शात्र शुद्ध पद्धतीने शेती करण्यासाठी सेवा संस्थाकडून ट्रेनिंगदेखील घेतली. त्या सध्या ८० किलो कापूस वेचणी करतात. हा प्रवास करताना त्यांनी मागे पाहिलेच नाही. त्यांनी पुढील शिक्षणासाठी बारावीतदेखील प्रवेश घेतला. सध्याचा जमाना हा सोशल मिडीयाचा असल्याने, त्या सोशल मिडीयावर एकदम अॅक्टिव्ह झाल्या. लिंकडिन साईडवर त्यापूर्णपणे अॅक्टिव्ह असतात. तसेच सेवा संस्थामार्फत - अनेक महिलांना सक्षम आणि जागृत करण्याचे काम त्या करतात. सध्या त्या २०० महिलांना जोडून महिला संघटनचे मोठे काम त्या करत आहेत. त्यांचा हा प्रवास वाखण्याजोगा आहे.या प्रवासात त्यांची ओळख एका मॅडमच्या माध्यमातून अॅग्रोस्टार अॅपशी झाली. मग त्यांचा प्रगतीशील शेती करण्याचा आलेख अधिक वाढत गेला. ते या अॅपवर फोटो टाकून पिकाविषयी अचूक माहिती प्राप्त करतात. तसेच पिकासाठी अचूक सल्ला मिळवून त्यानुसार फवारणीदेखील करतात. त्यांना याचा रिझल्ट एकदम उत्तम मिळाल्याने त्या अॅपच्या माध्यमातून इतर महिलांसाठी पिकाविषयी वेगवेगळया पोस्ट करत असतात. जेणेकरून इतर महिलादेखील आपल्या चौकटीतून बाहेर पडून यशाच्या मार्गाने वाटचाल करतील. संदर्भ - शेतकरी महिला मंच, ही मुलाखत लाइक अन् शेयर करा. आपल्या आजूबाजूलादेखील महिला शेतकरी असतील, तर त्यांना ही आपली मुलाखत देण्यासाठी प्रोत्साहन द्या. जय किसान!
37
9