AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी अर्ज सुरू
योजना व अनुदानAgrostar
शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी अर्ज सुरू
✅महिलांसाठी महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत शिलाई मशीन तसेच पिठाची गिरणी 90 टक्के अनुदानावर देण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहे. 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलांना काही अटी व शर्ती ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे त्या संबंधित अटी शर्तीमध्ये जर महिला पात्र ठरली तर त्या महिलेला 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन / पिठाची गिरणी देण्यात येईल. त्यासाठी सर्वप्रथम महिलेला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडणे गरजेचे आहे. ✅ अर्ज करण्यासाठी या महिला पात्र: 👉🏻 पिठाची चक्की योजने करता अपंग महिलांना अर्ज करता येईल तसेच पिको फॉल मशीन साठी इतर महिला अर्ज करू शकतात. 👉🏻 अर्ज करणारी महिला 17 ते 45 वर्षे या वयोगटातील असावी. 👉🏻 अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा. 👉🏻 अर्जदार महिलेने पाच वर्षाच्या आत योजनेचा लाभ पूर्वी घेतलेला नसावा. लाभ घेतलेला असल्यास पात्र ठरवण्यात येणार नाही. 👉🏻 तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र महिलेकडे उपस्थित असावे. 👉🏻 महिलेला एका वेळी फक्त एकाच योजने करता अर्ज भरता येणार आहे म्हणजेच शिलाई मशीन किंवा पीठ गिरणी या दोन पैकी एकाच साठी अर्ज करता येईल. 👉🏻 अर्ज करण्याचा कालावधी – 9 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी ✅अर्ज कसा करावा? 👉🏻 अर्ज करताना अर्जदाराकडे संबंधित आवश्यक संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असने गरजेचे आहे अर्ज करताना सर्वप्रथम अर्जाचा नमुना उपलब्ध करून घेणे गरजेचे असून खाली अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे तो सर्वप्रथम डाऊनलोड करावा. 👉🏻 अर्जाच्या नमुन्यांमध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती अर्जदाराला योग्य प्रकारे भरणे आवश्यक असेल अर्ज भरल्यानंतर त्यासोबत जोडायची कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे ती कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. ✅आवश्यक कागदपत्रे: 👉🏻 अर्जदाराच्या वयाचा दाखला 👉🏻 उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड 👉🏻 आधार कार्ड 👉🏻 विज बिलाची प्रत 👉🏻 बँक पासबुक झेरॉक्स 👉🏻 अर्जदार महिला अपंग / विधवा / दारिद्र रेषेखालील असल्यास त्याबाबत चे प्रमाणपत्र ✅संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
1
इतर लेख