गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शिकारी पक्ष्यांची काळजी
पक्षी विविध पिकांचे नुकसान करतात, परंतु कीड व्यवस्थापनात त्यांचेही मोठे योगदान आहे. काही युक्त्या आणि कृतींचा अवलंब केल्याने हे नुकसान टाळले जाऊ शकते. भारतात पक्ष्यांच्या एकूण १३०० प्रजातींची नोंद आहे. शिकारी पक्ष्यांपैकी उदा: बगळा, ब्लॅक ड्रोन्गो, मैना, चिमणी, कावळे इ. हे प्रमुख आणि महत्त्वाचे पक्षी आहेत.
सुमारे २० वेगवेगळ्या जातींचे पक्षी अळी आणि किडे खातात. काही शिकारी पक्षी विविध पिके, बीटल टोळ, तुडतुडे आणि विविध पाने खाणाऱ्या अळ्या तसेच भाजीपाला व पिकांचे नुकसान करणारी मावा कीड खातात. एरंडी आणि भुईमूग पिकांना हानी पोचवणा-या अळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष्यांचे योगदान लक्षणीय आहे. याव्यतिरिक्त, ते हुमणी देखील खाऊन त्यांची संख्या कमी करतात. पक्ष्यांच्या सुमारे ५०% आहारामध्ये वेगवेगळ्या अळ्या असतात. मांसभक्षक असणाऱ्या पक्ष्यांची देखभाल करणे फार महत्वाचे आहे._x000D_ _x000D_ शिकारी पक्ष्यांची काळजी:-_x000D_ • बहुतेक पक्षी झाडांवर घरटे करतात. जर नैसर्गिक घरटे उपलब्ध नसतील, तर कृत्रिम घरटी झाडे किंवा खांबांवर किंवा शेतातील इमारतींवर ठेवा._x000D_ • शेतीच्या बाजूला असणारी झाडे बऱ्याच पक्ष्यांना आकर्षित करतात. म्हणून, अशी झाडे तोडू नका, परंतु त्यांचे संरक्षण करा आणि इतर झाडे वाढवा._x000D_ • शिकारी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी शेतात पक्ष्यांची कृत्रिम प्रतिकृती स्थापित करा._x000D_ • पक्ष्यांना बसण्यासाठी शेतीमध्ये टी-आकाराचे लाकडी सापळे बसवा._x000D_ • मोठ्या संख्येने शिकारी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी आणि किटकांचे नियंत्रण जास्तीत जास्त करण्यासाठी पिकामध्ये या उपक्रमांचे अवलंब करणे आवश्यक आहे._x000D_ • पक्षी सकाळी आणि संध्याकाळी (४ ते ६ वाजता) खाद्यपदार्थांच्या शोधात खूप सक्रिय असतात. त्यामुळे, शेतीची कामे जसे की सिंचन, काढणी, नांगरणे व इतर शेतीविषयक कामे त्यांच्या वेळेत केली पाहिजेत. परिणामी, पक्षी सहजपणे जमिनीवर आलेल्या अळ्या, हुमणी, कोष उचलून खाऊ शकतात._x000D_ • शेतीतच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
481
0
इतर लेख