क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताराजस्थान पत्रिका
शासन युरियाच्या संतुलित उपयोगाला देणार प्रोत्साहन
नवी दिल्ली: खतांचा योग्य वापर आणि या उदयोगामध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याचा विचार करीत आहे. यामध्ये यूरियासाठी पोषण आधारीत अनुदान दर (एनबीएस) निश्चित करण्याची योजना तयार केली जात आहे. पोषण अनुदान कार्यक्रमाची सुरूवात सरकारने २०१९ मध्ये केली होती. या अंतर्गत यूरिया वगळता अनुदान युक्त फॉस्फेट आणि पोटॅश (पी एंड) असणारे खते प्रत्येक ग्रेडसाठी वार्षिक आधारवर अनुदानची रक्कम निश्चित केली जाते.
सरकारने युरियाचा होणारा गैरवापर थांबावा यासाठी हे पाऊल ऊचलत असल्याचे सांगितले जात आहे. एनबीएस दर निश्चित करण्यामुळे यूरियाच्या योग्य वापरास प्रोत्साहन मिळेल. युरिया हे एक असे नियंत्रित खत आहे. ज्याला सांविधानिक रूपने आधिसूचित एक समान दरला विक्री केली जाऊ शकते. खतांचा गैरवापर थांबविण्यासाठी केंद्र सरकारने मागील कार्यकाळामध्ये मोठे पाऊल ऊचलताना याला नीम कोटेड केले होते. एनबीएसच्या या प्रयोगामुळे संतुलन येण्याची शक्यता आहे. संदर्भ- राजस्थान पत्रिका, ७ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
68
0
संबंधित लेख