कृषी वार्तादैनिक भास्कर
शासन बनविणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
नवी दिल्ली: काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च-सेंट्रल मॅकेनिकल इंजीनियरिंग रिसर्च इस्टिट्यूट लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनविण्याच्या तयारीत आहे. या ट्रॅक्टरची किंमत एक लाखापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हा ट्रॅक्टर भारतीय बाजारात सर्वात स्वस्त असणार आहे. शासनाद्वारा संचलित रिसर्च व डेव्हलपमेंट विंग पुढील एक वर्षात पश्चिम बंगाल स्थित दुर्गापूर कार्यक्षेत्रात हा ट्रॅक्टर पहिल्यांदा चालून पाहणार आहे. संस्थेचे निदेशक हरीश हीरानी यांच्या मते, संस्थानद्वारे १० हॉर्सपॉवरची क्षमता असणारा हा बॅटरी संचलित छोटा ट्रॅक्टर बनविण्याचे काम चालू आहे. या ट्रॅक्टरमध्ये लीथियम बॅटरी असणार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ट्रॅक्टर एक तास चालेल. संस्थान खूपच कमी वजनाचे ट्रॅक्टर बनविण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून लघु शेतकऱ्यांसाठी सुविधाजनक असेल. या ट्रॅक्टरला चार्ज करण्यासाठी संस्थान शेतीमध्ये सौर ऊर्जा असणारे स्टेशन लावण्याचा विचार करत आहे, जेणेकरून शेतकरी न थांबता शेतीमध्ये काम करू शकेल. संदर्भ – दैनिक भास्कर, २२ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
173
0
इतर लेख