AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शासन देणार ५० कोटी अनुदान!
कृषी वार्तादैनिक भास्कर
शासन देणार ५० कोटी अनुदान!
केंद्र सरकारने 'पंतप्रधान किसान संपदा' या योजने अंतर्गत १७ राज्यांमध्ये मेगा फूड पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या राज्यांमध्ये फूड पार्क स्थापन करणाऱ्यांना ५० कोटी रु. अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने एक जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील कृषी प्रक्रिया उद्योगाकडून अर्ज मागविले आहेत. या जाहिरातीनुसार गोवा, मणिपूर, मेघालय, सिक्किम, तमिळनाडुसह सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रस्तावांचा विचार केला जाईल. जर या राज्यांकडून प्रस्ताव नाही आले, तर बिहार, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम व त्रिपुरा या राज्यात मेगा फूड पार्क उभारण्याचे प्रस्ताव पाठविले जाऊ शकते. या मेगा फूड पार्कसाठी ९ फेब्रुवारी २०१९ अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये केंद्र शासन एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देणार आहे. जी जास्तीत जास्त ५० कोटी ही असू शकते. जर प्रकल्पाची किंमत १०० कोटी असल्यास, सरकार ५० कोटी रु. अनुदान देणार आहे.
या योजनेचा हेतू शेतकरी, प्रक्रिया उद्योग व किरकोळ विक्रेत्यांना एकत्रित आणून कृषी उत्पादन असलेल्या बाजारपेठेशी जोडण्याकरिता एक प्रणाली तयार करणे हा आहे, तसेच शेती उत्पादनांच्या किंमती वाढविणे, वाया जाणाऱ्या अन्न पदार्थांना आळा घालणे, शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी देणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये शेती किंवा बागकाम क्षेत्र बनविणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आधुनिक खाद्य प्रक्रिया युनिट, योग्य पुरवठा साखळी सोबतच शीत शृंखला ही असेल. संदर्भ - दैनिक भास्कर, २४ डिसेंबर २०१८
52
0