योजना व अनुदानmaharashtra times
शरद पवार ग्राम समृद्धी योजना!
➡️महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येत आहे .ही योजना " मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध " या ध्येयासाठी राबवण्यात येत आहे.
योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्त्याला गाई आणि म्हैस याकरिता पक्का गोटा बांधणे , शेळीपालन शेड बांधणे,कुकुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवन नाडेप कंपोस्टिंग करीता लाभ मिळवून देण्यात येत आहे.
➡️गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे: एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
➡️शेळीपालन शेड बांधणे: किमान २ शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल. एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करण्यात येईल.
➡️कुक्कुटपालन शेड बांधणे: कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
➡️भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग: शेतात एक नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकीरी भूसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे. तो निधी उपलब्ध केला जाईल.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल.तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे हमी कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड नसल्यास ते मिळ्वण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात अर्ज करावा लगेल.
आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड
२. रेशन कार्ड
३. रहिवासी प्रमाणपत्र
४. मतदान कार्ड
५.पासपोर्ट साइझ फोटो व मोबाइल नंबर .
संदर्भ:- Maharashtra times.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा