AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 व्हॉट्सअँपवर तक्रार नोंदवता येणार!
कृषि वार्ताAgrostar
व्हॉट्सअँपवर तक्रार नोंदवता येणार!
👉🏼अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते याला तोंड द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बोगस बियाणांमुळे बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकाच्या संदर्भात व्हॉट्स ॲपवर तक्रार करता येणार आहे. 👉🏼काही दिवसापूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक घेतली. यावेळी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला. राज्यात अनेक ठिकाणी कापसाच्या बोगस बियाणांची विक्री होत आहे. 👉🏼यासाठी महाराष्ट्रात असलेला महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असून त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिलेत. 👉🏼कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले आहेत. 👉🏼शेतकऱ्यांनी व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
2
इतर लेख