AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 व्हॉटसएपवरुनही तुम्ही गॅस बुक करु शकता!
समाचारTV9 Marathi
व्हॉटसएपवरुनही तुम्ही गॅस बुक करु शकता!
➡️सध्या ऑनलाईन सुविधांमुळे LPG गॅस बुक करणे पूर्वीच्या तुलनेत सोपे झाले आहे. अगदी व्हॉटसएपवरुनही तुम्ही गॅस बुक करु शकता. भारत गॅस, इंडियन ऑईल आणि एचपी गॅसने ग्राहकांना व्हाट्सअँप वरून सिलिंडर बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ➡️यासाठी तुम्हाला संबंधित गॅस एजन्सीमध्ये नंबर रजिस्टर्ड करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला सिलिंडर बुक करता येणार नाही. ➡️याशिवाय, तुम्ही मोबाईवरुन मिस्ड कॉल देऊनही सिलिंडर बुक करु शकता. इंडियन LPG च्या ग्राहकांनी ८४५४९५५५५५, तर BPCLच्या ग्राहकांना ७७१०९५५५५५५ आणि HP गॅस एजन्सीला ९४९३६०२२२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गॅस बुक करता येईल. ➡️एचपी गॅस एजन्सीचे ग्राहक ९२२२२०११२२ या व्हाट्सअँप क्रमांकावरूनही गॅस बुक करु शकतात. नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर व्हाट्सअँप वर ऑर्डर माहिती येईल. यामध्ये गॅस कधी येणार याचा संपूर्ण तपशील असेल. ➡️भारत गॅसच्या बुकिंगसाठी तुम्हाला १८००२२४३४४ या व्हाट्सअँप क्रमांकाचा वापर करता येईल. त्यावर हाय लिहून पाठवल्यानंतर रिप्लाय येईल. सिलेंडर बुक करण्यासाठी बुक असे लिहून पाठवावे. त्यानंतर तुम्हाला सगळा तपशील मोबाईलवर पाठवला जाईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
9
इतर लेख